अजित पवारांचा भाजपला टोला: विरोधी पक्ष नेत्यांच्या सोयीच्या वेळेनुसार घ्या, मी काय पुण्यातच असतो

393

भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गोंधळातच पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी अजितदादांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली. पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद झाला होता. 

या वादावर अजित पवार म्हणाले की,’मी महापौरांना सांगितलं होतं, विरोधी पक्षनेत्यांच्या सोयीच्या वेळेनुसार कार्यक्रम घ्या. मी काय पुण्यातच असतो’ असं म्हणत अजितदादांनी फडणवीस यांना टोला लगावला.तसंच, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल आजपासून तात्पुरतं बंद करत आहोत, गरज लागली तर परत सुरू करू’ अशी माहितीही पवारांनी दिली.

पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होता. दोन दिवसांपासून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार म्हणून बातम्याच बातम्या ऐकायला मिळाल्या. आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे म्हणणार होतो. त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

पुण्याच्या विकास कामांसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. विकासकामांसाठी एकत्र येऊ, तशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली शिकवणूक दिली आहे’ असं अजित पवार म्हणाले.