युट्युबरच्या व्हिडीओवरून भडकला अक्षय कुमार टाकला 500 कोटींचा मानहानी दावा

1

सुशांतसिंग राजपुत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांचे नाव यामध्ये घेण्यात आले. सुशांत सिंग राजपुत प्रकरणी अक्षय कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गुपचुप बोलायचे असे राशिद सिद्दीकी नावाच्या एका युट्युबरने म्हंटले आहे. त्याच्यावर अक्षय कुमारने 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. अक्षय कुमारच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

राशिद सिद्दीकी हा बिहार मधील रहिवासी असून त्याचे वय 25 वर्ष आहे. राशिद सिविल इंजिनिअर असल्याचे सांगितले जात आहे. सुशांतसिंग राजपुत बाबतीत त्याने वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे अनेक आरोप केले आहेत. त्याने या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, अक्षय कुमार सुशांतसिंगची मैत्रीण रिया चक्रवर्तीला कॅनडाला पळवून नेणार होता. याशिवाय उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना गुप्तपणे भेटला असेही राशिदने म्हंटले आहे.

राशिदच्या या व्हिडिओमुळे अक्षय कुमार भडकला, आणि त्याने राशिदवर केस टाकत 500 कोटी मानहानीचा दावा टाकला आहे. अक्षयच्या वर्कफ्रँटबद्दल बोलायचे तर अक्षय सध्या ‘लक्ष्मी’ चित्रपटामुळे प्रचंड गाजला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. परंतु याचे नाव बदलून पुन्हा प्रदर्शित केला आहे.