अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ आज प्रेक्षकांच्या भेटीला

1

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. डीझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या हॉरर चित्रपटाची चर्चा सोशल मिडियावर जोरदार सुरू आहे. यामध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असून ट्रेलर व गाण्यांनाही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट ‘कांचना’ या प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

‘कांचना’ या चित्रपटाचा दिग्दर्शक राघवा लॉरेन्स यानेच हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. हि करियरच्या सर्वात अवघड आणि आव्हानात्मक भूमिका असल्याची प्रतिक्रिया अक्षय कुमारने एका मुलाखतीत दिली होती. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी या नावावरून बराच वाद झाला होता. सुरवातीला या चित्रपटाचे ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे नाव होते. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर करणी सेनेने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावरून आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे नावात बदल करण्याचाही मागणी केली होती. त्यांनतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव काढून ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. आज हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीस येत आहे.