स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या दोन कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत हा किताब पटकावला. एलन मस्क यांची एकूण संपत्ती १८८.५ अब्ज डॉलर एवढी आहे. त्यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा १.५ अब्ज डॉलरने अधिक आहे. टेस्लाच्या शेअर किंमतीत सतत वाढ झाल्यामुळे एनल मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले. मूळच्या दक्षिण आफ्रिकेच्या असणाऱ्या या इंजिनिअरचं नेट वर्थ न्यूयॉर्कमध्ये सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास 188.5 बिलियन डॉलर इतकी होती. हा आकडा बेजोस यांच्या तुलनेत $ 1.5 बिलियननं जास्त आहे. बेजोस या यादीत 2017 पासून अग्रस्थानी होते. पण, आता मात्र त्यांची क्रमवारी घसरली आहे.
मागील 12 महिन्यांचा आढावा घेता हा काळ मस्क यांच्यासाठी खास ठरला आहे. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक मिळकतीमध्ये तब्बल 150 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. आतापर्यंत ही सर्वाधित वेगानं झालेली वाढ ठरत आहे. मिळकतीत झपाट्यानं वाढ होण्यामागे टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली वाढ हे मुख्य कारण आहे. मागील यामध्ये 743 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, 2020 मधील नोव्हेंबर महिन्यातच मस्क यांनी बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं होतं.