“आता फक्त नोटांवर गांधीजींच्या जागी मोदींचा फोटो येणे बाकी” राष्ट्रवादीचा मोदींना टोला

22

पाच राज्यांतील निवडुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पं.बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमुल अशी सरळसरळ लढत होणार आहे. यंदा ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधनी केली आहे. स्टार प्रचारकांतर्फे सभा, मोर्चे यांचा सपाटाच लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवरच निवडणुक आयोगाने एक महत्वाचा निर्णय दिला. पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदींचा फोटो असणारे होर्डींग्ज काढण्याचे तसेच कोवीड लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचे फोटो काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निर्णयावरुनच राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोदींना लक्ष केले आहे.

“मोदीजी फोटो काढण्याच्या स्पर्धेर खुोच पुढे आहेत. पेट्रोल पंप, रेल्वे स्थानके, विमानतळ जिकडे बघाव तिकडे मोदींचेच फोटो आपल्याला दिसतात. खादीच्या कॅलेंडरवरसुद्धा त्यांनी स्वत:चा फोटि छापला. तसेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरसुद्धा त्यांनी स्वत:चा फोटो लावला आहे.जर असच सुरु राहिलं तर काही दिवसांत नोटेवरील गांधीजींचा फोटो काढून मोदी तिथे स्वत:चा फोटो लावतील.” अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

पेट्रोल पंपावरील तसेच कोवीड लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील नरेंद्र मोदींच्या फोटोमुळे मतदार प्राभवित होण्याची शक्यता आहे. तसेच ते पं.बंगालमधील निवडणुकांमध्ये भाजपचे स्टार प्रचारक असणार आहे. त्यामुळे त्यांचे हे फोटो आचारसंहितेचा भंग करणारे ठरु शकतात. अशी व्यथा तृणमुल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणुक आयोगाकडे केली होती.

यावर पेट्रोल पपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो ७२ तासाच्या आत हटवण्याचे निर्देश दिले. तसेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील फोटोसंबंद्धीसुद्धा सुचना दिल्या आहे. त्यानुसार यापुढे लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो नसणार आहे.