तसेच हे शेतकरी स्वइच्छेने मेले आहेत : भाजपच्या ‘या’ मंत्र्याचे वादग्रस्त विधान

9

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून ज्या शेतकर्‍यांचा मृत्यू आंदोलनात झाला आहे ते घरी असते तरी मेले असते, तसेच हे शेतकरी स्वइच्छेने मेले आहेत असे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि हरयाणाचे कृषी मंत्री जे पी दलाल यांनी केले आहे.

शेतकरी आंदोलनात 200 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. हे शेतकरी घरी असते तरी ते मेले असते. इथेही मरत आहेत. लाख दोन लाख लोकांमध्ये 200 जणांचा सहा महिन्यात मृत्यू होत नाही का? कोणी हार्ट अटॅकने मरतं कोणी आजारी पडून मरतात. हिंदुस्थानात सरासरी नागरिकाचे व काय आहे?असे दलाल एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

हे शेतकरी कुठल्या अपघातात मेले नाही तर स्वइच्छेने मेले आहेत त्यांच्याप्रति मला संवेदना आहे असेही दलाल यावेळी म्हणाले.या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर कृषीमंत्री दलाल यांनी माफी मागितली.

आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तरी आपल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो असे दलाल म्हणाले.