कोरोनाच्या काळात बाहेर जाण्यास मनाई असल्याने ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.ई-कॉमर्स असलेल्या Amazonच्या वेबसाईटवर विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू नेमक्या कोणत्या देशातल्या आहेत, याबाबत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. मात्र ई-कॉमर्स कंपन्यांना यामध्ये खूप फायदा झाला आहे. परंतु व्यापार वाढवण्यासाठी या कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन देखील केले जात आहे. व्यापार संघटना कॅटने हा दंड पुरेसा नसल्याचे सांगितले आहे. आणि Amazon कंपनीवर 7 दिवस बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे.
दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत आहे. कॅटच्या मते अशा कंपन्यांना शिक्षा देणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून पुन्हा अशी चूक होणार नाही. कॅटने अशी मागणी केली आहे की पहिल्यांदा उल्लंघन झाल्यावर 7 दिवस आणि दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास 15 दिवस अशा प्रकारे बंदी आणली पाहिजे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया आणि महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांच्या मते एवढाचं दंड आकारणे न्याय आणि प्रशासनाची देखील चेष्टा केल्यासारखे आहे. झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने दंड आणि शिक्षेची तरतूद करावी अशी कॅटने मागणी केली आहे.