लॉकडाऊनच्या काळात ‘अमेझॉन’ची छप्परफाड कमाई

7

अमेझॉन इंडियाने मंगळवारी म्हटलं आहे की, त्यांनी त्यांच्या वैश्विक स्त्रोतांद्वारे 100 वेंटिलेटर्स मिळवले आहेत. हे व्हेंटिलेटर्स देशात आयात केले जातील. विमानांद्वारे हे व्हेटिंलेटर्स भारतात दाखल होतील. 

बर्‍याच लोकांनी ऑनलाईन खरेदी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत, ऑनलाइन शॉपिंगच्या निरंतर वाढीमुळे, अमेझॉन या ई-कॉमर्स साईटने या तिमाहीमध्ये विक्रमी विक्री नोंदवली आहे. अमेझॉनच्या विक्रीत तब्बल 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मार्चच्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न वाढून कमाई 8.1 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई 2.5 बिलियन डॉलर्स इतकी होती. ही आकडेवारी साथीच्या रोगाच्या काळात लाखो लोकांनी ऑनलाइन खरेदी वाढवली असल्याचे दर्शवते.

अमेझॉनची विक्री 108.5 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये हे व्हेटिंलेटर्स भारतात पोहोचतील, अशी माहिती अमेझॉनकडून देण्यात आली आहे.