राज्यात ईडीच्या सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. ‘भाजप प्रिय ईडी, एकदा मेहता, बापट आणि दरेकरांकडे एखादा कप कॉफी घ्यायला जा, नाही तर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या लोकं ‘सनम बेवफा’ म्हणतील,’ असा वार अमोल मिटकरी यांनी केला आहे
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा सुरू झाली आहे.अमोल मिटकरी यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून ही बोचरी टीका केली आहे.खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळत आहेत, त्याचाच परिणाम म्हणजे ईडीची नोटीस आहे”, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. तर, खडसे यांनी आपल्याला अद्याप नोटीस आली नसल्याचं म्हटलं आहे.
भाजपा प्रिय ED, नोट बंदी झाल्यानंतर जय अमित शहा यांच्या कंपनीकडे जे 90 करोड रुपये होते, नोटबंदी नंतर 700 करोड रुपये जमा झाले. ही माहिती आजपर्यंत तू का दिली नाहीस गं ? कधीतरी त्यांच्या घरी जाऊन पण समन्स बजावत जा ! मग वाटेल तू भाजपाची गुलाम नाहीस, असा खोचक टोला मिटकरी यांनी एका ट्विमधून लगावला आहे.