अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला म्हणाल्या …

6

नवे निर्बंध 22एप्रिलपासून रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहेत. सरकारच्या या निर्बंधाबाबत नेत्यांमधून संंमिश्र प्रतिक्रिया आल्या.

महाराष्ट्रातील ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार नागरिक विनाकारण जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकणार नाहीत. 

विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली मत व्यक्त करताना लॉकडाऊन मान्य असल्याचं म्हटलं आहे.पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे.त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मुंबईतील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच प्रकारचा सल्ला दिला होता.