अमृता फडणवीस यांच नवं गाणं येतंय ! दिलं ट्रॉलर्सना प्रतिउत्तर…

37

माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल केलं जातं. काही दिवसांपूर्वीच ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्यावर डिसलाईक्सचा भडीमार करण्यात आला होता.

‘तिला जगू द्या’ या गाण्याचा आशय चांगला असला तरी राजकीय विरोधाने ट्रोल केलं जातं असं देखील त्या म्हणाल्या आहेत. 17 डिसेंबर रोजी त्यांचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती स्वतः अमृता फडणवीस यांनी दिली आहे. .

‘कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. माझ्या आयुष्यातील हे चढ उतारांचे भाग आहेत. मी लहानपणापासून गाणं शिकत आहे. त्यामुळे मला माझ्या क्षमता माहित आहेत. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे, की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला माहित आहे.’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतांना कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. असं अमृता फडणवीस म्हणाल्या. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळी फडणवीस बोलत होत्या.