केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे.आज दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
त्रुटी आणि उणिवांबाबत अभ्यास करणाऱ्या उपसमितीसोबत आज मंत्रालयात खलबंत होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि काही शेतकरी संघटनांमधील वाद मिटविण्यासाठी समिती स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यातच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनीसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बाईकवरुन दिल्ली गाठली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी तिथल्या आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
सरकारी संस्थांशी वाटाघाटी अयशस्वी ठरली. म्हणून आम्ही एक समिती स्थापन करू ज्यात सरकारसह आंदोलक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तसेच देशातील त्या शेतकरी संघटनांचे लोक असावेत जे अद्याप आंदोलन करत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांबाबत मंत्रालयात आज खलबते होणार आहेत.मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे.