गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्याचं अनेक बैठकांचं सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये वाढता कोरोना संसर्ग आणि त्यावर सरकारतर्फे उचलण्यात येणारी पावलं यावर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्र संपादक, मालक आणि वितरक यांच्याशी लॉकडाऊनच्या विषयावर चर्चा करुन लॉकडाऊन व्यतिरिक्त काही दुसरा पर्याय आहे का याबाबत माहिती घेतली.
राज्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.