अन असं सांगतानाच पक्षात येणार का म्हणून मुनगंटीवारांना ‘या’ नेत्याची ऑफर

6

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, त्याबाबत छगन भुजबळ यांना विचारण्यात आले. छगन भुजबळ आज पुण्यात होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद देण्याची चर्चा मीही ऐकून आहे. ही चर्चा थांबल्यावरच खरं काय ते कळेल, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री राज्याचे आहेत.त्यांना कोणीही भेटू शकतात. मुनगंटीवार भेटू शकतात. फडणवीस भेटू शकतात. चंद्रकांतदादाही भेटू शकतात, असं सांगतानाच पक्षात येणार का म्हणून मुनगंटीवारांना विचारा, असं भुजबळ यांनी हसत हसत म्हणताच एकच हशा झाला.

जयंत नारळीकरांसारखे वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या देशातील सेलिब्रेटीजनी बाहेरच्या देशातील लोकांनी यावर बोलू नये असं मत व्यक्त केलंय. मग माझं त्यांना सांगणं आहे की, तुम्ही तरी त्यावर बोला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे. पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करतायत, रेल्वे ट्रॅकवर बसून, रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत, त्यावर पण बोलायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.