अन तो विडिओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वर्ष 2020 किती कठीन राहिले, या विषयी मी तक्रार करणार नाही

9

आनंद महिंद्रा यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सांगण्यात आले आहे, की हैदराबाद येथील मल्लेश्वर राव पार्टीतील उरलेले अन्न कशा प्रकारे गरजू मुलांना वाटतात. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले आहे, “हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वर्ष 2020 किती कठीन राहिले, या विषयी मी तक्रार करणार नाही. 

पेशाने इंजिनिअर असलेले मल्लेश्वर राव रोज जवळपास 500 ते 2 हजार लोकांना भोजन देतात. मल्लेश्वर राव यांनी 2011मध्ये ‘डू नॉट वेस्ट फूड’ मोहिमेला सुरुवात केली होती. आता त्यांची टीम कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात उरलेले भोजन जमा करते आणि ते खाण्या योग्य असल्यास गरजू लोकांत वाटते.

राव यांनी सांगितले, की त्यांच्या एका मित्राने सांगितले होते, की केटरिंगच्या कामातून पैसे कमावले जाऊ शकतात. यानंतर त्यांनी पार्टटाईम नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्न वाया जाते. यानंतर त्यांनी या कार्यक्रमातील उरलेले अन्न गरजू लोकांना वाटायला सुरुवात केली. समाजासाठी कशा पद्धतीने योगदान दिले जाऊ शकते हे आपण शाळेत शिकलो, असे राव सांगतात.