देशात पुन्हा एकदा कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. यंदा मात्र अधिक गतीने कोरोना फैलावत आहे. परिणामी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान लसीकरणाचे वय कमी करुन २५ करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. ऊद्धव ठाकरेंच्या या मागणीला महिद्रा समुहाचे संचालक आनंद महिंद्रा यांनी समर्थन दिले आहे.
कोरोनाने आता तरुणवर्गास टार्गेट जरण्यास सुरुवात केली आहे. तरुण वयोगटातील रुग्णसंख्या तेजीने वाढते आहे. त्यामुळे लसीकरणाचे वय आता ४५ वरुन २५ वर्षे करण्यात येऊन २५ वर्षांवरील सर्वांना लस ऊपलब्ध करुन द्यावी अशी विनंती ऊद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
याअगोदर ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे ऊद्धव ठाकरेंनी बैठकीत म्हटले होते. पंतप्रधानांनी ती मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहे. तसेच अधिकाधीक लस पुरवण्यात यावी अशी विनंतीसुद्धा केली आहे.
आनंद महिंद्र यांनी ऊद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच लॉकडाऊन न केल्याबद्दल अभारही मानले आहेत. काही दिवसांअगोदर लॉकडाऊन न लावण्याबाबतचे ट्वीट आनंद महिंद्रांनी केले होते. त्यावर सल्ले देऊ नका असा टोला मुख्यमंत्र्यांनी महिंद्रांना लगावला होता.