यंदा पावसाळा सरासरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदाची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीत शेतकऱ्याच्या मालाला हमीभावापेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केल आहे.
तसेच कृषी मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करण गरजेचे असून, केवळ पीक उत्पादनात वाढ महत्त्वाची नाही, तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम संशोधन यांच्या माध्यमातून दर्जेदार पीक उत्पादन करावे आणि आपला ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्रात जे पिकेल ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असले पाहिजे, असे सांगतानाच विभागवार पिकांचे वर्गीकरण करून महाराष्ट्र हा शेतीतील ब्रॅण्ड झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.