आणि काहीही अडचण आली तर मला कळव : शरद पवार

85

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे.

निलेश लंके यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: घेतली आहे. शरद पवार यांनी रुग्णालयातून घरी आल्यावर आमदार निलेश लंके यांना फोन केला होता.

त्या ठिकाणी रुग्णांची अतिशय चांगली व्यवस्था देखील ठेवली आहेस असं समजलं हे अतिशय चांगलं काम आहे. पण हे काम करताना तू स्वत:चीही काळजी घे आणि काहीही अडचण आली तर मला कळव”, असं शरद पवार यांनी निलेश लंके यांना म्हणाले आणि मोठा आधार दिला.