ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णा आंदोलन करणार आहेत .त्यांनी दिल्ली येथील रामलीला किंवा जंतर-मंतर मैदानात आंदोलनाची परवानगी मागितली होती .
अण्णा हजारे यांनी अखेर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.याआधी शेतकरी आंदोलनावर अण्णा हजारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. याआधी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे आणि नंतर खुद्द गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली होती.
अण्णा हजारे यांनी आपलं शेवटचं आंदोलन हे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असंही म्हटलं आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही अण्णा असं काही आंदोलन करणार नाहीत असं म्हटलं होते. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी घेतलेला आंदोलनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.