ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांच्याशी चर्चा केली आहे. आज, शनिवारपासून ता.३० होणारे उपोषण काही काळासाठी स्थगित केले आहे.
शुक्रवारी ता.२९ सायंकाळी स्वतः अण्णांनी या बाबत पत्रकारांना माहिती दिली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते.
”अण्णांनी जे आंदोलन स्थगित केलेय, त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द पाळावा, नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो,” असं राज्यमंत्री बच्चु कडू म्हणाले आहेत.
अण्णा हजारेंच्या भेटीसाठी अहमदनगरमध्ये पोहोचलेले बच्चू कडूंनी टीव्ही 9 मराठीसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कायदा मागे घेतला तर सरकारचे फार मोठे नुकसान होणार नाही, असंही बच्चू कडू म्हणालेत. शेतकरी कायद्याबद्दल शेतकऱ्यांशी बोलायला काही नाही म्हणून मौन बाळगण्याशिवाय पर्याय नाही, असंही बच्चू कडूंनी सांगितलंय.