शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ऊपोषण करण्याचा निर्णय अण्णा हजारेंनी स्थगित केला. अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीसांसमवेत अनेक बडे भाजप नेते राळेगणसिद्धित दाखल झाले होते. त्यानंतर अण्णांनी आंदोलन स्थगित करीत असल्याचा निर्णय घेतला. अण्णांच्या या स्थगितीच्या निर्णयामुळे त्यांच्यावर चांगलइच टीका होते अाहे. शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनातूनसुद्धा अण्णांवर टीका करण्यात आली. या टीकेच्या प्रत्युत्तरादाखल अण्णांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय?’ असे प्रश्न सामानाच्या अग्रलेखातून ऊपस्थित करण्यात आले. असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. ‘लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळायला हवीत,’ अशी भाषा अग्रलेखात वापरण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी शिवसेनेला धारेवर घेतले आहे.
अण्णा म्हणाले, ‘गेल्या चाळीस वर्षांत मी २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात अनेक छोटी मोठी आंदोलने केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले आहेत. त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचेही नेते आहेत. तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालत होतात. तेव्हाही मी आंदोलन केले. त्यावेळी तुमचे हे भ्रष्ट मंत्री घरी गेले हे विसरलात काय? तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कसे पाठिशी घातले. याची सर्व माहिती आहे आणि ती माहिती मी देईन’ असा इशाराही अण्णांनी दिला आहे.
आपल्या आंदोलनाच्या पद्धतीची माहिती देताना हजारे म्हणाले, ‘आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही. आतापर्यंतचा अनुभव पहाता सर्वच पक्षांच्या सरकार विरोधात मी आंदोलने केली आहेत. २०१४ पासून भाजप सरकारविरोधात मी आतापर्यंत सहा आंदोलने केली आहेत. राळेगणसिद्धी येथेही २०१९ मध्ये सरकारविरोधात आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय,’ असा सवालसुद्धा अण्णा हजारे यांनी शिवसनेला उद्देशून केला आहे.