राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 रिक्त पदे भरण्याची घोषणा

6

राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी राज्यशासनाकडून केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्याबाबत स्पष्ट सूचना दिलेली आहे.

16 हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार अशी 4 हजार पदे भरली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.