दिल्लीत अनलॉकच्या प्रक्रियेला सुरवात करण्याची घोषणा

9

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (ता.२८) दिल्लीत अनलॉकच्या प्रक्रियेला सुरवात करण्याची घोषणा केली.दिल्लीतील लॉकडाउन हळूहळू उठविण्यात येणार आहे. सर्वात आधी बांधकाम आणि कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

जर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली तर लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात येईल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलं आहे.

अनेक कामगार, गरीब लोक या क्षेत्रावर अवलंबून आहेत. पुढील एक आठवड्यासाठी ही दोन्ही क्षेत्रे खुली राहतील.असेही त्यांनी सांगितले आहे.

दिल्लीकरांनी नियमांचे पालन केले तर अर्थचक्र सुरू होईल. नियमांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्यास लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येईल.