पोलिस विभागात उच्च पदस्थ अधिकारी असलेले त्रिमुखे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तपास करीत होते. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा केला आहे. रिपब्लिक टीव्हीवर तपासाबाबत सातत्याने मुंबई पोलिसांविरोधात भूमिका मांडण्यात आली आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये एका परिसंवादात तपासाबाबत आणि माझ्याबाबत अनेक अर्थहीन वक्तव्ये करण्यात आली. ही चर्चा आरोपी रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्डवर होती. यामध्ये मुंबई पोलिस आणि माझी नाहक बदनामी करण्यात आली, असे दाव्यात म्हटले आहे. पत्रकारितेचे नियम धुडकावून अमानवी पद्धतीने केलेल्या या बदनामीबाबत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली आहे.
मुंबई पोलिस याप्रकरणी योग्य प्रकारे तपास करीत नाही, त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवावा, अशा प्रकारची भूमिका रिपब्लिकमधून मांडण्यात आली होती.
गोस्वामी यांच्या पत्नी सम्यब्रता यांच्या विरोधातही हा दावा केला आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणादरम्यान बदनामीकारक मजकूर प्रक्षेपित केला असा आरोप करणारा मानहानीचा दावा पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वमी आणि त्यांच्या पत्नीविरोधात आज सत्र न्यायालयात केला.