बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या डीएसके ॲण्ड ब्रदर्स कंपनीला न्यायालयाने आणखी एक धक्का दिला आहे.वरद सुशील पटवर्धन यांनी डी. एस. कुलकर्णी ॲण्ड ब्रदर्स व दिलीप सखाराम कुलकर्णी यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. या पूर्वी देखील आयोगाने डीएसके यांच्या विरोधात निकाल दिले आहेत.
पटवर्धन यांनी गुंतविलेली रक्कम मागितली असता कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.तक्रारदाराला मुदतीत रक्कम न दिल्यास पुढील कालावधीसाठी सहा लाख रुपयांसाठी वार्षिक १५ टक्के व्याज आकारण्यात येईल.
तक्रारदाराला त्यांचा ठेवीचे सहा लाख रुपये १२ टक्के व्याजदराने आणि निकालाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत देण्यात यावे, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी दिला.
पटवर्धन यांनी डीएसके यांच्या कंपनीत ३० मे व १२ सप्टेंबर २०१४ रोजी तीन लाखांच्या दोन मुदतठेवी वार्षिक १२ टक्के व्याजदराने तीन वर्षांकरिता गुंतविल्या होत्या. ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारांना गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाचा धनादेश देण्यात आला.