आणखीन एक भावी मुख्यमंत्री ?

71

राज्यात मागच्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले व चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बॅनर्स बद्दल अनेक बातम्या झाल्या. एकेका आठवड्याच्या अंतराने सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी सुध्दा त्यांचे भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावण्यात आला यावर त्यांनी त्या कार्यकर्त्याला समजही दिला. या चर्चेला कारण होतं ते मा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर सरकार बदलणार असा अंदाज बांधला जात होता पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सरकार काही धोका झाला नाही.

महाविकास आघाडी मध्ये मोठा भाऊ कोण, जागावाटप कसे होणार ? पुणे लोकसभा जागा कोणाची ? महाविकास आघाडी टिकेल काय या सर्व विषयांवर जोरदार चर्चा सुरू असतानाच भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एक भर, नागपूरात नाना पटोलेंचे झळकले बॅनर, ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ असा उल्लेख, नागपूरच्या अजनी भागात नाना पटोलेंचे बॅनर लागले.

कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आमची भूमिका स्पष्ट आहे, विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, यापद्धतीचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्ज लावण्याची गरज नाहीए- असे होर्डिंग्ज कोणी लावू नये, असं मी माझ्या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो हा वाढदिवस माझा सामाजिक स्तरावर राबवला गेला पाहिजे गरजूंना मदत करण्याचा हा वाढदिवस सामाजिक स्तरावर गेला पाहिजे असे म्हणत नाना पटोले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली

२०१४ पूर्वी काँग्रेसच राज्यात मोठा आणि प्रमुख पक्ष होता, सर्वात जास्त वेळा आणि काळ राज्यात काँग्रेसच सत्ता होती मात्र २०१४ नंतर त्यांना अधोगती लागली व ते ४थ्या नंबर व फेकले गेले. काँग्रेसला पुन्हा ती समृद्धी येईल काय ? महाविकास आघाडीत मोठा भाऊ होईल काय ? हे पाहण्यासारखे असेल. जर भाजप शिवसेनेला बहुमत मिळालं नाही तर काँग्रेसही मुख्यमंत्रीपदावर आडून बसू शकते यातून काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो आता ते नाना पटोले असतील की बाळासाहेब थोरात असतील की अशोक चव्हाण असतील अजून वेगळाच कोणी नेता असेल हे काँग्रेस हायकामंड ठरवेल.