टीसी महाविद्यालयाच्या पेचात अजून एक मनाचा तुरा

20

बारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील आशिष तावरे या विद्यार्थ्याची रिलेशनशीप भरतीमधून ‘आर्मी अविएशन काॅर्पस’ मध्ये ‘सोल्जर टेक्निकल एंट्री स्कीम ‘ मार्फत भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.

आशिष हा बीबीएच्या (सीए) तृतीय वर्षात शिकत असून त्याचा महाविद्यालयातील एनसीसी मध्ये देखील सक्रिय सहभाग आहे .त्याने सिकंदराबाद येथे भरतीसाठी प्रथम शारीरिक चाचणी व त्यानंतर लगेचच वैद्यकीय चाचणी पाहिल्याच प्रयत्नात यशस्वी पणे पार पाडली.

आशिषच्या या यशामुळे टीसी महाविद्यालयाच्या पेचात अजून एक मनाचा तुरा उभारला आहे. आशिष तावरे याला महाविद्यालयातील लेफ्टनंट विवेक बळे यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव जवाहर वाघोलीकर व विद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रशेखर मुरुमकर यांनी अभिनंदन केले.