सीरम आणणार आणखी एक लस

10

नोवाव्हॅक्स कंपनीच्या सहकार्याने सीरम ईन्स्टीट्युट आणखी एक लस भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहे. ‘कोवोव्हॅक्स’ असे या नविन लशीचे नाव असणार आहे. ब्रीटनमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोनाच्या प्रकारावरसुद्धा ही लस प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. तसेच जून २०२१ पर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यत असल्याचे सीरमचे संचालक अदर पुनावाला यांनी सांगीतले आहे.

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या सहकार्यानं सीरमने ‘कोव्हिशिल्ड’ ही लस बाजारात आणली आहे. भारतात त्याचे लसीकरणही सुरु झाले आहे.
नोवाव्हॅक्स आयएनसीनं नुकतंचं जाहीर केलं होतं की, ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक चाचणीत त्यांची लस ८९.३ टक्के प्रभावी ठरली आहे. ही लस प्राथमिक विश्लेषणात ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी ठरली आहे.

सीरमसोबत भागीदारीत काम करत असलेल्या नोवाव्हॅक्स या करोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्यांचे चांगले परिणाम आले आहेत. भारतातही याच्या चाचण्या सुरु करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. नोवाव्हॅक्सने यापूर्वीच सहा लस निर्मिती स्थळांवर आपल्या लसीचा साठा करुन ठेवला आहे. सात देशांमधील त्यांच्या आठ प्लांटमध्ये या लसीचे दरवर्षी २ बिलियन डोस तयार केले जाणार आहेत. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे. अदर पुनावाला यांनी समाजमाध्यामाद्वारे ही माहिती दिली आहे.