आठ दिवसांत अजून एका मंत्र्याचा राजीनामा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या विधानाने मोठी खळबळ

45

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या आठ दिवसाच्या आत आणखी एक मंत्री राजीनामा देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता राजीनामा देणारा तिसरा मंत्री कोण ? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

मात्र, चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा देणाऱ्या तिसऱ्या मंत्र्याचे नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे अंदाज लावले जात आहेत. 

आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तुमच्या कर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी महविकास आघाडीवर केली आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्या मंत्र्याच्या राजीनामा देण्याबाबत दावा केला आहे.