मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले की दिल्लीत एक आठवड्यांनी लॉकडाऊन वाढवण्याला येणार असून त्याचा कालावधी पुढील सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये वाढ करून तो सोमवार ३ मे पर्यंत असणार आहे. केजरीवाल यांनी लॉकडाउन मुदत वाढविताना सांगितले की, दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दिवस वाढवणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन दरम्यान पॉझिटिव्हीटी रेट साधारण ३६-३७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर गेल्या एक-दोन दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण थोडेसे कमी झाले असून आज ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्लीला केंद्र सरकारकडून ४८० टन ऑक्सिजन वाटप करण्यात आले आणि शनिवारी केंद्र सरकारने १० टन अधिक ऑक्सिजनचे वाटप केले आहे, आता दिल्लीला ४९० टन ऑक्सिजनचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप दिल्लीला हा ऑक्सिजन पोहोचला नाही.