तिरंग्याचा अपमान करणार्‍यास त्वरित पकडावे

4

टीकैत यांचे पंतप्रधानांना ऊत्तर

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे. “तिरंग्याच्या अपमानामुळे देश दु:खी झाला आहे” असं पंतप्रधान म्हणाले. आजच्या मन की बात मध्ये ते बोलत होते. मात्र शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी लगेच पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिले अाहे. ”सर्व देश तिरंग्यावर प्रेम करतो. ज्याने तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पकडावं,” असे टीकैत यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल त्यांनी भाष्य केलं. भारताने करोनाविरोधात दिलेली लढाई जसं जगासमोर एक उदाहरण ठरलं, तसंच आता लसीकरणही ठरतंय, असं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. सोबतच दिल्ली येथे झालेला हिंसाचार आणि तिरंग्याचा अपमान याची खंत व्यक्त केली.

प्रत्युत्तरादाखल टिकैत यांनी ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्यास पकडावे असे म्हटले. सोबतच कृषी कायद्यांवरून शेतकरी व सरकारमध्ये पुन्हा चर्चा करण्याबद्दलही भूमिका त्यांनी मांडली. कोणत्याही दडपणाखाली आम्ही चर्चा करणार नाही. ते अामचेदेखील पंतप्रधान आहे. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही त्यांचे अभारी आहोत. असेदेखील टिकैत यावेळी म्हणाले.

चर्चा करुन तोडगा निघू शकतो, कायद्यांवरील स्थगिती अद्यापही कायम आहे. आम्ही चर्चेसाठी पुढाकार घेतो आहोत शेतकर्‍यांनीसुद्धा चर्चेसाठी पुढे यावे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.