दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर वाढला आहे. जळगाव मध्ये मात्र वापरलेल्या मास्कचा वापर चक्क गादी बनवण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वापरलेलं मास्क गादीमध्ये वापरलं जात असल्यानं संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र गादी भंडाराचे मालक अमजद अहमद मन्सूर यास अटक केली आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथे वापरलेल्या मास्कपासून गादी बनवण्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत सदरील व्यक्तीला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. सामन्यांच्या जीवाला मोठा धोका यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.