भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज, १२ डिसेंबर रोजी जयंती आहे.धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत अश्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
राजकीय क्षेत्रातून तसेच समाज माध्यामांतून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांना, ‘आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात’ असे भावूक ट्विट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तसेच तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.’आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत असे व्यक्त होत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.