वर्षा बंगल्यावर धुणी, भांडी कर्मचारी किंवा स्वयंपाकी म्हणून नियुक्त करा, अशा मागणीचे शेकडो ई-मेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून त्वरित भरतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नेट-सेटधारकांनी केली.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. राज्य सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय घेतला जावा, यासाठी संघर्ष समितीतर्फे वारंवार शासनाला निवेदन दिले आहे.
नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीतर्फे रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. राज्यातील सेट, नेट पात्र झालेले उमेदवार महाविद्यालयांमध्ये तुटपुंज्या वेतनावर अध्यापन करत आहेत.
राज्य सरकारने सहायक प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. प्राध्यापक भरतीला लवकरात लवकर मान्यता मिळावी, यासाठी नेट-सेट पीएच.डी.धारकांनी रविवारी आगळेवेगळे आंदोलन केले.