मराठी आणि महाराष्ट्र काय भिकारी आहे का? संतापात काय म्हणाले ऊद्धव ठाकरे

24

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तीसरा दिवस होता. यादरम्यान विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभारप्रद्रर्शन करतांना ऊद्धव ठाकरे यांनी भाजपवर चांगलेच ताशेरे अोढले आहे. यामध्ये सर्वात पहिला मुद्दा त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंद्धीचा ऊपस्थित केला. केंद्र सरकारकडूनच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडवणूक केली जात असल्याचे ते यावेळी बोलले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी आवश्यक असणार्‍या सगळ्या गोष्टींची पुर्तात राज्यसरकारडून झालेली आहे. मात्र केंद्रानेच हा दर्जा दिलेला नाही असा अारोप त्यांनी यावेळी केला. “मुख्यमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दुसरा मराठी भाषा दिन झाला. त्या मराठी भाषादिनानिमित्त आम्ही म्हणत असतो की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे?, आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देण्यात आल्या आहेत. आणखीन काही लागल्या तर त्याही देऊ. मात्र अजूनही केंद्राकडून माझ्या या मातृभूमिला तिष्ठत उभं ठेवलं आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

यावेळी संतापाच्या भरात मराठी काय भिकारी आहे का? महाराष्ट्राला काय भिकारी समजता का? आम्ही काय हातात कटोरा घेऊन दिल्लीदरबारी ऊभे आहोत का? असे सवाल त्यांनी ऊपस्थित केले.

हिंदुत्वाच्या गोष्टी भाजपकडून केल्या जातात. मात्र हिंदू राज्य स्थापन करण्याचे स्वप्न बघून सत्यात ऊतरवणार्‍या छ.शिवरायांची ही भाषा आहे. आणि त्या भाषेस तिचा मान देमन्यास तुम्ही नाकारताय हा तुमचा करंटेपणा महारष्ट्राची माणसं आणि हि माती कायम लक्षात ठेवेन अशा शब्दांत त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाना साधला.