अर्णब गोस्वामी आणि भाजपचा काही संबंध नाही: रावसाहेब दानवे

3

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली. त्यानंतर सरकारवर भाजपकडून मोठया प्रमाणात टिका करण्यात आली. याशिवाय गोस्वामी यांच्या सुटकेची मागणी करत आंदोलन देखील करण्यात आलं होतं. या गोष्टीचा बदला घेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना, अर्णब गोस्वामी आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्याबद्दल ते काही बोलत नाहीत का? माझ्यासाह इतर भाजपच्या नेत्यांवर ते टिका करत नाहीत का? एखादं चॅनेल तुमच्यावर टिका करत ते आमचं होत का? आमचा अर्णब गोस्वामींशी काही संबंध नाही. त्याचे सगळे कारनामे आपोआप उघडे होऊ लागले आहेत. असं दानवे यांनी म्हंटले आहे.

“ईडीने जेवढ्या आमच्यावर कारवाया केल्या तेवढ्या कुणावर केल्या नाहीत. काही चूक नसेल तर घाबरायचं काही कारण नाही. काहीही नसेल तर ईडीला आणि सिडीला घाबरता का? हे नैराश्यातुन केलेले आरोप आहेत, असं रावसाहेब दानवे यांनी म्हंटलं आहे. राज्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दाव्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, “दोन महिन्यात सरकार येईल.पण ते कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कस सांगू? “माझ्यावर टिका करण्याचा पवारांना अधिकार आहे, ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. परंतु मी त्यांच्यावर टिका करणार नाही. परंतु मला एक गोष्ट कळते की या राज्यातला कारभार आणि कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही.