रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मागील 7 दिवसांपासून अटक करण्यात आली होती. अर्णब गोस्वामी तळोजा तुरुंगात होते. त्यांचा जामीन अर्जदेखील न्यायालयाने अनेकदा फेटाळला होता. आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामिनीचा दिलासा मिळाला. अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. अर्णब बरोबर या प्रकरणात आणखी दोन जणांना जामीन मंजूर करण्यात आला. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणे ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असे महत्त्वपूर्ण विधान यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केले.
बुधवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. रात्री 8.15 वाजता अर्णब गोस्वामी तळोजा तुरुंगातुन बाहेर आले. जेव्हा अर्णब बाहेर आले तेव्हा ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी त्यावेळी भरपूर गर्दी केली होती. यावेळी अर्णब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा सुरू होत्या. ही गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त देखीव ठेवण्यात आला होता.
गोस्वामींचा जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज न्या. डॉ धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.