अर्णवने मराठी बाईचं कुंकू पुसलं : परिवहनमंत्री अनिल परब

5

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्या यांनी जमीन गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेनेचे नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं. “किरीट सोमय्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांना वाचवण्याकरता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली

“किरीट सोमय्या हे अर्णव गोस्वामी यांना वाचवायला बघत आहेत. म्हणजेच ते एखाद्या हत्याऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, ज्याच्यामुळे मराठी महिलेच्या पतीला आत्महत्या करावी लागली अशा माणसाला दिल्लीपासूनचे सर्व नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला आहे.