तुटलेले व्हेंटिलेटर तोडताना….

144

डॉ. आशिष देशपांडे

काचा, टेबलं आणि मशीन तूटलेल्या casualty मध्ये night off नंतर आज पुन्हा मॉर्निंग ड्युटी… सकाळी 6 am ची बर… म्हणजे सगळं आवरून PPE kit घालायचा वेळ पकडून कसं हीं करुन साडेपाच 5.30am वाजता हॉस्पिटल ला पोहचायचे… बऱ्यापैकी सामान्य माणसाची साखर झोपेची वेळ ! गेले कित्तेक दिवस अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी न अनुभवलेली !!
आज मनात जरा वेगळी भावना आहे डॉक्टर च्या खुर्ची मध्ये बसण्याआधी ! ड्युटी वर जाऊ कीं नको पासून, गेल्यावर आनंदाने काम करू कीं नको पर्यंत
भगवत गीता सांगते,
“जातस्या हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च !”
भावार्थ : इस मान्यता के अनुसार जन्मे हुए की मृत्यु निश्चित है और मरे हुए का जन्म निश्चित है।
असो गीता वाचणारे लोक आता उरलेत कुठे
मुद्द्याकडे जाऊया –
माणूस आजारी पडतो तो नेमका कश्यामुळे आणि कोणामुळे?? माणूस मरण पावतो नेमका कोणामुळे आणि कश्यामुळे??
उदाहरणं घेऊया – अमुक एका व्यक्तीला कोरोना झाला आणि हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर 2 तासात त्याचा मृत्यू झाला .
सद्य परिस्थिती मध्ये लोकांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही पेशंट चा मृत्यू हॉस्पिटल आणि डॉक्टर यांनी लक्ष न दिल्यामुळे मुळे होतो !
असो तरी थोडी पार्श्वभूमी आपण बघूया
50 वर्षांचा एक अज्ञात व्यक्ती..बाबा अगदीच स्वतःला फिट मानणारे ! पूर्वी पासून प्रचंड रागीट आणि हट्टी स्वभाव त्यामुळे high BP चा आजार जडलेला! पूर्वीपासून घरी सर्वांना डायबेटिस चा वारसा त्यामुळे bp सोबत high शुगर सुद्धा होतीच कीं, तरी गुलाबजाम अन शिरा पाहिजेच , जेवणात गोड नसेल तर आई ची खैर नाही !! असो… आता पुढे जाऊन रागाच्या भरात दररोज ची थोडी तरी दारू घेतल्याशिवाय झोप नाही आणि तंबाखू चोळल्याशिवाय संडास नाही!

बर ते झाले जुने आजार, ज्यावर मी फिट आहे म्हनुन आणि मला आयुष्यभराच्या गोळ्या नको न डॉक्टर ला फुकट पैसा नको म्हणून BP साखरेच्या गोळ्या न घेणारे बाबा बर पुढे जगभर कोरोना पसरला असताना हे म्हणतात मला काय होणार नाही , मास्क ची गरज तर बिलकुल नाही, मी गावात चक्कर मारून येतो ! दोन चं दिवसात जरा सर्दी ताप होता पण डॉक्टर कडे जायचं म्हणजे तो पैसा उकळायचे साधन, काढा घेऊन घरीच चार दिवस इलाज, पाचव्या दिवशी मुलगा बघतो तर काय बाबांना श्वास घेता येईना !! बोलता येईना कीं उठता येईना !! घाईने मग छोट्या जवळ प्रायव्हेट दवाखान्यात गेले तिथे डॉक्टर म्हंटले मोठ्या सरकारी दवाखान्यात न्या, शेवटी चार पाच ठिकाणं फिरून बाबा सरकारी emmergency casulty मध्ये- बेशुद्ध 260/120 mmhg BP आणि शुगर 450 mg /dl, oxygen 40%, कसा बसा एक icu बेड, ventilator arrange करुन बाबा admit झाले पण दुर्दैवाने या so called Fit बाबांना वाचवणे अशक्य झाले !
मुलगा म्हणतो डॉक्टर मुळे पैसा गेला आणि मृत्यू पण झाला ! मारा डॉक्टर ला, तोडा व्हेंटिलेटर, तोडा काचा !!
हे असे एकंच बाबा नाही 75%किंवा जास्तच लोक आपल्या भारतात आढळतात !
हेल्मेट न घालता 18 वर्षाचा मुलगा दारू पिऊन 100 च्या स्पीड ने रस्त्यावर race खेळतो आणि असिसिडेन्ट झाला मेंदू ला मार लागला म्हणून डॉक्टर जबाबदार होतो !

वृद्धाश्रमात ठेवलेली 30 किलो वजनाची 80वर्षची आजी पाठीला अन पायाला किडे पडले म्हनुण गेली त्याला डॉक्टर जबाबदार !
वासनेच्या आहारी जाऊन हजार लोकांशी शारीरिक संबंध ठेवून HIV एड्स आजार सारखे घेऊन फिरणारे मृत्यू सुद्धा डॉक्टर मुळे होतात !
मुलगा पाहिजे म्हणून 5 -6 मुलींना जन्म देऊन स्वतःचे रक्त 2gm ग्राम झालेल्या गरोदर बाई चा मृत्यू सुद्धा डॉक्टर मुळेच होतो !!!
मावा तंबाखू चे तोबरे, सिगारेट च्या नळ्या, आणि रोजच्या चार बाटल्या दारू ढोसून कॅन्सर झाला तरी तो डॉक्टर मुळे मेला !
अजून खूप काही !!!!
मर मर अभ्यास करुन शाळेत कॉलेजात पहिला नंबर काढून वयाची 10 वर्षं सणवार घरदार सोडून शिक्षण घेतलेले डॉक्टर सर्व आजार आणि मृत्यूला कारणीभूत असतील तर लोकांनी अश्या डॉक्टर कडे जाण्याआधी हजार वेळा विचार करावा आणि आपल्या मृत्यूचे कारण आणि इलाज स्वतः करावा.

Extraordinary talented people of India doing damage to already damaged healthcare by breaking ventilators and hospital infrastructure in high time of shortage of ventilators ! Breaking, abusing, hurting Health care workers n Doctors mentaly and physicialy when there is already shortage of qualified doctors !
dear Youth time to rethink and Use power in making rather than breaking
आई नेहमी म्हणते, विनाशकाले विपरीत बुद्धी !
आज हॉस्पिटल व्हेंटिलेटर आणि डॉक्टर तोडताना लक्षात घ्या जन्मायला आणि मरायला तुम्हाला याच ठिकानी जायचे आहे.

लेखक जिल्हा रुग्णालय बीड येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.