स्टिपलिंग आर्ट्सने श्री विठ्ठल बनवायचा हा पहिलाच प्रयोग
कल्याण, दि 29 जून – आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीचे वेगळे महत्त्व आहे. हा दिवशी भगवान विष्णूच्या (भगवान विठ्ठल) शेषनागावर शायनाची सुरुवात होते. यानिमित्ताने भाविक पंढरपूरला जातात. महाराष्ट्रच नाही तर देशभरातील भाविक विविध मार्गाने विठ्ठलाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड धारक, कल्याणचे रहिवासी आणि मोटिव्हेशनल स्पिकर, लेखक असणाऱ्या प्रा.डॉ.दिनेश गुप्ता यांनी श्री विठ्ठल हरींचे पोर्ट्रेट तीन तासांत स्टिपलिंग आर्ट्स (डॉट्स पिक्चर) करून साकारले. ही प्रतिमा तयार करण्यासाठी सुमारे 10,000 टिपक्या करण्यात आले. पहाटे १२ ते ३ वाजेपर्यंत तीन तासांच्या भक्तिमय प्रयत्नाने हे चित्र A4 आकाराच्या कागदावर साकार झाले.
उपलब्ध माहितीनुसार, श्री विठ्ठल हरी यांच्या चित्रासाठी स्टिपलिंग आर्टचा वापर करण्याचा हा पहिला प्रयोग होता.
श्री विठ्ठलाच्या भक्तीतून आपण हे चित्र साकारले असून लवकरच हे चित्र जागतिक विक्रमात नाव नोंदवण्यासाठी पाठवले जाईल, अशी माहिती श्री दिनेश गुप्ता यांनी दिली.