शेतकरी आंदोलनाचा परिणाम, हरियाणात २ नगरपरिषदा, ३ नगरपालिकेत भाजपचा दणदणीत पराभव

262

दिल्लीच्या बॉर्डरवर सुरू असलेल्या कृषी आंदोलनाचा फटका भाजपला हरियाणात बसलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला हरियाणातील मतदारांनी नाकारलं आहे. हरियाणातील दोन महापालिका आणि तीन नगरपरिषदा भाजपने गमावल्या आहेत.

सोनीपत, अंबाला आणि पंचकुला  महापालिकांच्या निवडणुकित भाजपला पराभव स्विकारावा लागला. महापौरांची थेट जनतेतून निवड पहिल्यांदाच झाली.  सोबतच सांपला, रेवडी आणि उकालना या नगरपरिषदांसाठीच्या निवडणुकाही पर पडल्या. नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्षांनी बाजी मारली आहे.

फक्त पंचकुला नगरपरिषदेमध्ये भाजपाचे कुलभूषण गोयल यांना विजय मिळाला आहे. बाकी सगळ्या ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. उकलानामध्ये अपक्ष उमेदवार सुशील साहू, सांपला नगरपालिकेत अपक्ष उमेदवार पुजा तर धारुहेडामध्येही अपक्ष उमेदवार कंवर सिंह जिंकले आहेत. अंबालामध्ये शक्ती राणी जिंकल्या आहेत. तसोनीपतमध्ये काँग्रेसचे उमेदवार निखिल मदान यांनी विजय मिळवला. या सर्व जागांवर भाजप उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.