‘शरद पवार साहेबांची निवड होणार हे समजताच, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या उरात धडकी’

20

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी माध्यमांमध्ये चांगलीच चर्चिली गेली. युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. ‘UPA अध्यक्षपदी आ. पवार साहेबांची निवड होणार हे समजताच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या उरात धडकी भरली असून, त्यांचे जुने आजार जागी झाले आहेत. हळूहळू त्यांची मानसिक स्थिती खालावलेली दिसेल.’ अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

कशरद पवार यांची पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी शिफारस केल्याच्या देखील चर्चा माध्यमांत रंगल्या होत्या. यानंतर महाराष्ट्रातील अनेक भाजप नेत्यांनी टीका केली. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या निर्णयाच समर्थन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी म्हणजेच विरोधी पक्ष नेत्यापदी निवड होणार हे समजताच भाजप नेत्यांना धडकी भरल्याची टीका केली.