संजय राठोड यांच्यावर होत असलेले आरोप आणि पोहरादेवी येथे केलेले शक्तीप्रदर्शन याबाबत प्रश्न विचारला. मात्र, नितीन राऊतांनी बोलण्याचे टाळले आणि थेट सभागृहातून तडक उठून गेले.
विरोधकच नसले तर सरकारचा गाडा व्यवस्थित चालणार नाही आणि सध्याचे विरोधक त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत. शेवटी काय तर, निंदकाचे घर असावे शेजारी, असे ते म्हणाले. शेवटी पत्रकारांनी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी चुप्पी साधली. तसेच सभागृहातून बाहेर पडले.
अधिवेशनापूर्वी राठोड यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मात्र याबद्दल बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री राठोडांचा राजीनामा घेणार का, हे येणारा काळ ठरवेल.
तसेच मुंबईमध्ये देखील संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सेनेच्या एका मोठ्या नेत्याने हात जोडले. त्यामुळे आता सत्ता पक्षातील नेते राठोडांबाबत बोलण्याचा का टाळत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हा प्रकार घडला.