तमाशातील अदाकारीला दाद देण्यासाठी हवेत उडणारे फेटे आता बंद झाले, निघणारे हास्याचे फवारे थांबले ,शिट्ट्या टाळ्या ऐकू येईनात या धंद्यातील दीडशे कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल थांबली आहे.
फेबुरुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात यात्रा भरतात .दिवसेंदिवस कोरोना वाढू लागल्याने सार्वजनिक यात्रा समारंभ जत्रा, यात्रा यावर बंदी आली आहे .
तमाशाच बंद झाल्याने या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.काहीजण मिळेल ते काम करून उपजीविका करत आहेत प्रत्येक मिनिटाला आपल्या विनोदाने हसविणार्या कलावंताच्या डोळ्यात मात्र पाणी आहे .
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने गावा गावातील जत्रा यात्रा बंद झाल्याने घुंगरांचा आवाज थांबला आहे. ढोलकी वर नाचणारे बोटे स्थिरावली आहेत.