बायकोला माहेराला नेलं म्हणून, नवऱ्याने सासूला पॉर्न क्लिप पाठवल्या

66

बायकोला माहेरी नेल्याने एका नवऱ्याने हद्द पार केली केली आहे. नवऱ्याने स्वतःच्या सासूच्या फोनवर अश्लील व्हिडीओ क्लीप पाठवल्या, सासूच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणात हा प्रकार घडला आहे. आरोपी मोहम्मद अक्रम पाशा तेलंगणात हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरात एका खाजगी कंपनीत नोकरी करतो.

सात महिन्यांपूर्वी परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासूनच छोट्यामोठ्या कारणावरुन तो आपल्या पत्नीला त्रास देत असे, अशी माहिती आहे. तिला माहेरी जाण्यासही त्याने विरोध दर्शवला होता. तरुणी पाच महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे सासूने आपल्याला काही दिवसांसाठी मुलीला माहेरी नेऊ द्या, अशी विनंती जावयाला केली. मात्र, त्याने पुन्हा नकार दिला.

तरीही सासू आपल्या लेकीला जबरदस्ती घरी घेऊन गेली.
सासूचा जावयाला राग आल्याने. तो बायकोच्या माहेरी गेला आणि त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सासूच्या मोबाईलवर शिवराळ आणि लैंगिकदृष्ट्या प्रक्षोभक व्हिडीओ क्लीप्स पाठवल्या. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.