ऊद्धव ठाकरेंचा एकेरी ऊल्लेख केला म्हणून कार्यकर्त्यांनी चेहर्‍याला फासले काळे!

39

ऊद्धव ठाकरे यांचा एकेरी ऊल्लेख केला या कारणावरुन संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी संबंद्धित व्यक्तीच्या चेहर्‍यास काळे फासले आहे. सोबतच त्यास साडी नेसवण्याचदेखील प्रयत्न केला. पंढरपुर येथील ही घटना आहे. विशेष म्हणजे ऊद्धव ठाकरेंचा एकेरी ऊल्लेख करणारी ही व्यक्ती भाजपाचे माजी पदाधिकारी आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे.

वीजबिलवाढविरोधात भाजपाने राज्यभर आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमिवर पंढरपुर याठिकाणी आंदोलन सुरु असतांना कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाले आणि आता करोना होईल म्हणून घरात बसतात” असं कटेकर म्हणाले होते. तसेच आक्षेपार्ह वक्तव्यदेखील केले. यावरुन संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या चेहर्‍यास काळे फासले आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण शांत झाले आणि मोठा अनर्थ टळला.

शिवसेनेचे पंढरपूर शहरप्रमुख रवी काळे यांच्या नेतृत्वाखाली २५ हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी कटेकर यांना गाठून त्यांना शिवीगाळ केली. कटेकर यांना चपलांचे हार घालण्यात आले. त्यानंतर भाजपनं शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शिरीष कटेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यांवरुन भाजप आणि सेनेत चांगलीच जुंपलेली आहे. नागपुरमधील एका इसमाविरुद्ध सोशल मिडियावर ऊद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. काहीदिवसांअगोदर वाशिम जिल्ह्यातसुद्धा सेना विरुद्ध भाजप असे चित्र होते. शिवसेनेच्या खा.भावना गवळी यांनी भाजपचे आमदार आणि वाशिम जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांना धमकावले होते. परिणामी पाटणी यांनी वाशिममध्ये भावना गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर जिल्हाभरात तणावाचे वातवरण होते. जागोजागी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी राज्यभरात प्रतिक्रिया ऊमटल्यस होत्या.

“ठाकरे सरकार हुकुमशाहीचे सरकार आहे. सरकारविरुद्ध बोलणार्‍यास महाराष्ट्रद्रोही ठरवले जाते.” अशी टीका भाजपाकडून सातत्याने राज्य सरकारवर होत असते. माजी जिल्हाधिकार्‍यास काळे फासल्याचा हा प्रकारसुद्धा चागंलाच तापणार असल्याचे दिसते आहे. आक्रमक शैलीत मते मांडणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडून यावर काय प्रतिक्रिया येत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.