‘औरंगाबादचं नावं बदलायला सांगितलं, त्यांनी विमानतळाचं बदललं’; तुम्हाला मुख्यमंत्री न बनवता सरपंच केलं असतं तर…

99

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, अजूनही संभाजीनगर नावाची मागणी पूर्ण झालेली नाही.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फक्त विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनवता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी टिव्ही 9 मराठीशी बोलताना केली.

औरंगाबादच्या नामांतरावरुन होत असलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. शिवसेनेला महाविकास आघाडीत काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.