मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत तरुणाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

11

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राज्यात चर्चेत आला आहे. मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने वेळ मागून घेतल्याने सुनावणी ५ फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. यावर संतप्त होत औरंगाबादेत दत्ता भोकरे या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

बुधवारी रात्री सोशल मीडियावर मी आत्महत्या करत आहे असा ऑडियो संदेश टाकून क्रांती चौक याठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी विषारी औषधाचे प्राशन केले. मराठा मोर्चाचे समन्वयक अभिजित देशमुख आणि विनोद पाटील यांनी तत्काळ या तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने सदरील तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा अत्म बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांची यावेळी प्रकर्षाने आठवण झाल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या मराठा तरुणांनी सांगितलं. मात्र, आपला लढा संविधानाला अनुसरून असून टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.