धक्कादायक घटना; वाढदिवसाला नग्न अवस्थेत नाच करत बलात्कार करण्याचा प्रयत्न

28

पुण्यात कोंढवा येथे घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साळुंके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये घडली. कैलास महेश गणात्रा (राज) याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेसमोर नग्न अवस्थेत 3 जणांनी डान्स केला. त्या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तीघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कैलास महेश गणात्रा (राज) आणि तर त्याचे साथीदार अमोल कंडई व सिध्दार्थ शेट्टी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तीघेही आरोपी तीच्या ओळखीचे आहेत. यातील राजचा वाढदिवस असल्याने ती त्याच्या घरी गेली होती.

यावेळी त्यांनी गाणी लावून त्यांनी डान्स सुरु केला. हळू हळू प्रत्येकाने आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून टाकले. यानंतर तीघेही नग्नावस्थेत नाचू लागले. यानंतर महिलेला जवळ ओढून गालाला व अंगाला हात लावून अश्‍लिल वर्तन करण्यात आले. यानंतर तीच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. तीने विरोध करताच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकाराचा धक्का बसल्याने ती महिला महिना झाले आजारी पडली होती. यानंतर ती बरी झाल्यावर तिने तक्रार दाखल केल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.