औरंगाबाद : भाजप आमदारावर गुन्हा दाखल

8

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. औरंगाबाद मधील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवसेनेच्या कृष्णा डोनगावकर यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.

कारखान्यातील सभासदांची तब्बल १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत बंब यांच्यावर आरोप आहे. सभासदांचे पैसे त्यांनी स्वतःचा नातेवाईक आणि मित्रांच्या अकाऊंटवर वळवले असा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला आहे. याबाबतीत आमदार बंब यांनी प्रतिक्रिया दिली असता, आकसापोटी आणि बदनाम करण्यासाठी हा गुन्हा माझ्यावर दाखल केला आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.